किकवी-केंजळ रोडवर ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
कापूरहोळ : भोर तालुक्यातील किकवी-केंजळ रोडवर शनिवार (११ एप्रिल) दुपारी ३:३० वाजता संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. किकवी येथिल रहिवाशी दिपक चंद्रकांत इंगवले (वय ३० वर्ष) यांनी राजगड पोलिस स्टेशन किकवी चौकीला या घटनेबाबत तात्काळ माहिती दिली.
इंगवले हे त्यांच्या घरासमोर रस्त्यावर गर्दी जमल्याने ती पाहण्यास गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला निळ्या रंगाचे जर्किंग, निळी जीन्स आणि पांढरा टी-शर्ट मधील अज्ञात व्यक्ती (वय सुमारे ४० वर्षे) वेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी सागे १०८ ॲम्बुलन्स बोलावली. सायंकाळी ४:३० वाजता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला, ओळख पटविण्यासाठी पोलिसां समोर आव्हान असुन त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.




