ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील शिवरे गावामध्ये विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत : खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियानांचे वाटप


 

शिवरे : भोर तालुक्यातील शिवरे गावात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाणे आणि कीडनाशकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवरे गावातील ९० आणि रांजे गावातील १२, अशा एकूण १०२ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे आणि कीडनाशक औषधांचा लाभ मिळाला आहे.

कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (राहुरी कृषी विद्यापीठ) यांचे सोयाबीन पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आधुनिक पेरणी पद्धती, कीड-रोग व्यवस्थापन आणि वैज्ञानिक शेती तंत्रांवर मार्गदर्शन लाभले. खासदार सुळे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या, “शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि शेती उत्पादनवाढ ही माझी प्राथमिकता आहे.”

Advertisement

यावेळी डॉ.समी रेड्डी (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था संचालक)  डॉ. धीरज शिंदे (बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ) डॉ. पवार (ऊस शास्त्रज्ञ) संतोष करंजे (विषयतज्ज्ञ) आणि संतोष गोडसे, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी भूषण पुरोहित तसेच सरपंच अमृता गायकवाड उपस्थित होते. केळवडे, कांजळे, शिवरे पंचक्रोशीतील  शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.l

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!