ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा किकवी येथे शुभारंभ


किकवी : बुधवार दि. १७ ग्रामीण विकास व पंचायतराज प्रणालीला बळकटी देणे, नागरिकांना शासनाच्या सेवा थेट उपलब्ध करून देणे, आरोग्य व पोषण जनजागृती वाढविणे तसेच स्वच्छता, लोकसहभाग यावर आधारित विविध राज्य व केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानांचा शुभारंभ ग्रामपंचायत किकवी, ता. भोर, जि.पुणे येथे आज करण्यात आला.

या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना एकूण २५० कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. तालुकास्तरावर प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख आणि तृतीय ८ लाख रुपये, जिल्हास्तरावर प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाख रुपये तर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील. इतकी पारितोषिके देणारी ही देशातील पहिलीच योजना असल्याचे बोलले जात आहे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निमित्ताने, ग्रामपंचायत किकवीच्या माध्यमातून, महिला ग्रामसभा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, व्हीसी कार्यक्रम, यावेळी विशेष ग्रामसभा घेण्यात आली, त्याचप्रमाणे अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढून स्वच्छतेच्या घोषणा दिल्या, सर्व ग्रामस्थ, महिलांनी, शाळेचे विद्यार्थी यांनी उस्फूर्त सहभाग घेऊन गावामध्ये स्वच्छता केली.

Advertisement

यावेळी ग्रामपंचायत किकवी सरपंच नवनाथ कदम, उपसरपंच भास्कर सकपाळ, ग्रामविकास अधिकारी विजय गेजगे, सदस्य दिपाली काकडे, चित्रा कोंढाळकर, संजय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती भोर संचालक नवनाथ भिलारे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र मोदी, माजी उपसरपंच अभिमन्यू कोंढाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष किरण घारे,उपाध्यक्ष तानाजी भिलारे, माजी उपसरपंच मौलादीन शेख, सामाजिक कार्यकर्ते, चेतन कोंढाळकर, जेष्ठ मार्गदर्शक उत्तम अहिरे, संभाजी पाटणे, अनंता काकडे, विश्वास निगडे,डी. एम. अहिरे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुख्याध्यापक विनोद राऊत, मिलिंद मगर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत गुरव, अंगणवाडी सेविका वैशाली मोहिते, स्वाती पाटणे, किरण निगडे, मदतनीस रोहिणी निगडे, प्रियांका निगडे, मेघा निगडे, शिल्पा निगडे, वनिता पाटणे, जिल्हा उपकेंद्रातील डॉ. रत्नपारखी ,ऊरसळ सिस्टर, आशा वर्कर्स मुक्ता अहिरे, छाया भिलारे,या सर्व मान्यवरानी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला होता.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!