ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र नारायणपूर येथे बिबट्याकडून चार शेळ्यांची शिकार ! वन विभागाचा गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा


श्री क्षेत्र नारायणपूर येथे बिबट्याकडून चार शेळ्यांची शिकार ! वन विभागाचा गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

नारायणपूर : पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरच्या पायथ्याला असलेल्या कापूरहोळ रोडलगत बोरकर वस्तीतील डोंगराच्या बाजूला आप्पा शंकर कोकरे यांच्या घराबाहेर बांधलेल्या चार शेळ्यांवर पाडव्याच्या रात्री गुरुवार, दि. १९ रोजी रात्री २.३० च्या सुमारास बिबट्याने नकळत हल्ला चढवला. तीन शेळ्या ठार तर एक गायब झाल्याची खबर वन विभाग सासवडचे परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी दिली.

Advertisement

कोकरे यांनी सकाळी वन विभागाला कळवताच वनपाल गणेश पवार व वनरक्षक योगेश नजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी दरम्यान बिबट्याने शेळ्या खाल्ल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले. नुकसान भरपाईसाठी कागदपत्रे तयार करून कोकरे यांना सादर केली.

पुरंदर किल्ल्याच्या डोंगराजवळ बिबट्याचे वास्तव्य असल्याने गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. माजी सरपंच चंद्रकांत बोरकर व ग्रामसेवक भाऊसाहेब भवर यांनी सांगितले, “रोज रात्री गस्त घालतो, पण परवा गारपावसाने गारठा होता. त्यामुळे गस्ती थांबली आणि बिबट्याने संधी साधली.” वन विभागाने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, जाळ्या व गस्त वाढवण्याची योजना आखली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!