ताज्या घडामोडी

एसटी बस आणि इको गाडीचा भीषण अपघात ! इको गाडीतील तरुणाचा जागीच मृत्यू ! बस चालकावर गुन्हा दाखल


भोर : रामबाग मार्गावर भोर एसटी डेपोच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसमध्ये आणि डेपोहून रामबागकडे जाणाऱ्या इको गाडीमध्ये समोरासमोर धडक झाल्याने इको गाडीतील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. ५ मे रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या आसपास घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत दोन्ही वाहनांचे चालकांवर गुन्हा दाखल केला असून, जखमींना उपचारासाठी भोर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर एसटी डेपोत येणारी एसटी बस (एमएच ०६ एस ८२९४, भोर-दुर्गाडी-भोर मार्ग) वेगाने येत असताना डेपोच्या बाहेरून रामबागेकडे जाणारी इको गाडी (एमएच ०५ सीएम ५७५२) ला जोरदार धडक बसली. या अपघातात इको गाडीतील एक २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.

रामबाग चौकातून भोरकडे जाणाऱ्या या मार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. मात्र, एसटी बसचा वेग आणि इको गाडीचा वळण घेण्याचा प्रयत्न यामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील वेग नियंत्रण आणि वाहन तपासणीची मागणी केली आहे. भोर पोलिसांनी वाहनांचा ताबा घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. या अपघाताने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!