ताज्या घडामोडी

लग्न समारंभातील जेवणातून ६२ जणांना विषबाधा ! पुरंदर तालुक्यात खळबळ  


सासवड : पुरंदर तालुक्यातील सुपे व सोमर्डी परिसर हादरला असून, नाझरे येथील लग्नसमारंभातील जेवणाने अन्नविषबाधेचा गंभीर प्रकार घडला. ३ मे २०२६ रोजी झालेल्या या लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या नागरिकांना रबडी, भाजी, गुलाबजाम, बटाटावडा आदी पदार्थ खाल्ल्यानंतर अचानक उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही तासांतच ६२ हून अधिक नागरिक बाधित झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व उपकेंद्र गराडे येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर रुग्णांना सासवडला हलवले तर १२ रुग्णांना आय.व्ही. उपचार देण्यात आले. उर्वरितांवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबवली असून, किरकोळ लक्षणे असलेल्यांनाही तातडीने मदत केली जात आहे.

Advertisement

फूड प्रशासनाकडे सॅम्पल पाठवण्याचा प्रयत्न असला तरी लग्न रविवारी झाल्याने ते शक्य झाले नाही, असे पुरंदरचे आरोग्य अधिकारी विक्रम काळे यांनी सांगितले. या घटनेमुळे लग्नसमारंभातील अन्नगुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपटले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी सतर्कता बरकरार ठेवण्यात आली आहे.

पुरंदर तालुका आरोग्य विभागाने गावात घरोघरी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून किरकोळ लक्षणे असलेल्या नागरिकांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!