पुणे (ST) एसटीचा क्रांतिकारी निर्णय ! ड्युटीपूर्वी चालकांना अल्कोटेस्ट बंधनकारक !! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक पाऊल
पुणे : प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे एसटी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता चालक आणि वाहकांना ड्युटी सुरू करण्यापूर्वी अल्कोटेस्ट चाचणी द्यावीच लागेल. चाचणीत पास झाल्यानंतरच बस चालवण्याची मुभा मिळेल. या कडक पावलामुळे मद्यप्रवृत्तीच्या प्रवृत्तीला पूर्णपणे लगाम घातला जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पुणे विभागात ८८२ चालक, १०५२ वाहक आणि ९१२ बस कार्यरत आहेत. या सर्वांची दररोज अल्कोटेस्ट तपासणी होईल. प्रत्येक आगारात यंत्रणा उभी केली असून, निकाल डिजिटल पद्धतीने नोंदवले जातील. भविष्यात शिस्तभंगाच्या कारवाईसाठी हे पुरावे ठरतील. पहिल्यांदा दोषी आढळल्यास निलंबन, तर सतत उल्लंघन झाल्यास सेवाविरामाची कारवाई होईल.
मागील काळात मद्यप्राशनाच्या तक्रारींमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता नियमित तपासणीसह अपघात टाळता येतील. याचबरोबर राज्यातील एसटी ताफा इलेक्ट्रिक करण्याची मोठी योजना राबवली जात आहे. २०३७ पर्यंत संपूर्ण १० हजार बस इलेक्ट्रिक होणार असून, प्रदूषण कमी होईल आणि वाहतूक आधुनिक होईल.
या निर्णयामुळे शिस्तीची नवी संस्कृती रुजेल आणि प्रवासी सुरक्षित प्रवासाचा आनंद लुटतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला




