मुळशीतील युनायटेड क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतरित होणार ? 500 कामगाराचे भविष्य अंधारात
पुणे : पौड – धनवेवाडी ता. मुळशी येथील युनायटेड क्रेन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी 12 वर्षापासुन चालु आहे, स्थानिक व इतर शहरातुन आलेले सुमारे 500 कर्मचारी आहेत, पण रस्त्याची झालेली बिकट अवस्था बाबत प्रशासनाकडे तब्बल 12 वर्ष पाठपुरावा केला असता, स्थानिक प्रतिनिधी व प्रशासनाकडुन कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करत आहेत.
कंपनीमुळे शेकडो कुटुंबीयांचे संसार चालतात,कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागला पाहीजे, काही कामगारांनी याच नोकरीच्या जिवावर कर्ज काढून घर बांधल आहे, तर काहीनी हप्त्यावर गाड्या घेतल्या आहेत, स्थानिक लोकांना घर भाडेकरूच्या मार्फत उत्पन्न चालु आहे,तर महिला भगिनींच्या जेवण डब्बे, खाणावळी सुरू आहेत. कंपनीच्या छोटी- मोठी कामं ही स्थानिक ठेकेदाराला मिळतात, काही युवकांनी कंपनीच्या मालवाहतुक करण्यासाठी कर्ज काढुन गाड्या घेतल्या आहेत.
12 वर्षात प्रशासन रस्ता करु न शकल्यामुळे युनायटेड क्रेन कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने महाराष्ट्रातील हा प्रकल्प बंद करून गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरबारी रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र सरकारकडून कंपनीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार विनंती करूनही सरकार कुठलाच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे कंपनीची गैरसोय झाली होती, परिणामी खराब रस्ते व आपल्या सुख – सुविधांच्या कारणांवरून काही कंपन्या महाराष्ट्र सोडून चालल्या आहेत.
सरकारने वेळीच यामध्ये लक्ष घालून या कंपन्यांना लागणाऱ्या मुलभुत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी होत आहे,




