शिक्षण

ऑक्स्फर्ड इंटरनॅशनल स्कुलमध्ये रक्तदान करून शिक्षक दिन साजरा


किकवी : 5 सप्टेंबर 24 (गुरुवार) किकवी ता. भोर,जि.पुणे येथे शिक्षक दिन व माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे अवचित साधत ऑक्स्फर्ड इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य उमेश सोनवले सर यांच्या संकल्पनेतून व पुरंदर ब्लड सेंटर हाय व्हिजन नसरापूर, मोरया वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,

मानवाने विज्ञानातील प्रगतीच्या जोरावर सर्व काही साध्य केले आहे. मात्र मानवास अजुनही रक्तनिर्मीती करता आलेली नाही. अशातच रुग्णालयातून रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो, ही परिस्थिती लक्षात घेत शिक्षणा बरोबरच एक सामाजिक उपक्रम राबवण्याचे काम गेली 2 वर्ष उमेश सोनवले सर करत आहेत, त्यांच्या या कामाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे

Advertisement

शिबीरात 104 रक्तदात्यांनी रक्तदान केले, 126 लोकांनी डोळे तपासणी केली, तसेच 260 लोकांनी बॉडी तपासणी करून घेतली, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला 1 टी शर्ट व अल्पोपहार देण्यात आला,तसेच पुरंदर ब्लड सेंटर नसरापूर यांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. व मोरया वेलनेस सेंटरच्या तज्ञांकडून बॉडी चेकअप करून योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घघाटन डॉक्टर ज्ञानेश्वर महाडिक यांच्या हस्ते झाले,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मंदार माळी  होते, शिबिरासाठी पालक व स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!