राजगड (वेल्हा) तालुक्यात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर १२३ घरांचा पाया भरणा भूमीपूजन सोहळा संपन्न ! आदिवासी कल्याणासाठी मोठा निर्णय
वेल्हा : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री व पालकमंत्री मा.श्रीमती सुनेत्रवहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे आमदार श्री.शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून राजगड तालुक्यातील एकूण ३०० आदिवासी कुटुंबांपैकी १२३ आदिवासी बांधवांच्या घराचा पाया भरण्याचा भूमीपूजनाचा भव्य कार्यक्रम गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज वार गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मौजे कादवे येथे सौ. शालिनी कडू यांच्या पार पडला.
यावेळी शालिनी कडू म्हणाल्या की आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. लवकरच सर्व कुटुंबांना पक्की घरे मिळणार असून या उपक्रमाने आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे, तसेच यामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला सौ.शालिनी कडू (प्रकल्प अधिकारी, पुणे जिल्हा परिषद), राजगड तालुका सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, संबंधित अधिकारी, ग्रामस्थ, पदाधिकारी, सरपंच व उपसरपंच स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.




