ताज्या घडामोडी

लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्यास सुरुवात ; नाविन 1200000 महिलांनाही मिळणारं योजनेचा लाभ


लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण प्रावयास मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे, विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे आधारकार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेमुळे लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता अशा लाडक्या बहिणींना देखील आता पैसे मिळणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा चालु करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधारकार्ड लिंक करण्याचे राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Advertisement

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेमुळे महिलांना सन्मान निधी मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

महाराष्ट्र शासन महिलांच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध असून, या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्याबरोबरच आत्मसन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास मिळेल.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!