राजकीय

साऱ्या महाराष्ट्राचा भार जो वाहतो, होय आमचा “विठ्ठल” बारामतीत राहतो : गणेश खुटवड


बारामती : गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्त  शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी राज्यभरातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार कार्यकर्त्यांची रिघ लागलेली पहावयास मिळाली, या 84 वर्षाच्या योद्धाला भेटण्यासाठी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे राज्यभरातील आणि पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भोर युवक अध्यक्ष गणेश खुटवड आपल्या युवक पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना येऊन गोविंद बागेत शरद पवारांना दिवाळी निमित्ती, दिवाळी पाडव्याला भेटून दिपावलीच्या शुभेच्छा  देऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच भोर विधानसभा निवडणुकी बाबत, तालुक्यातील विविध समस्या, महत्वाचे विषयावर साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी भोर तालुक्यातील गावरान फळांचा “वानवळा” राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने दिपावलीच भेट म्हणून देण्यात आला.

Advertisement

मात्र यंदा पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवे साजरे केले जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी यंदा दिवाळी पाडवा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवारांचा गोविंदबागेत तर काटेवाडीत अजित पवारांचा दिवाळी पाडवा साजरा होत आहे. तरीही गोविंद बागेतील गर्दीमध्ये ज्येष्ठांसह युवकांची लक्षणे उपस्थिती होती.

आज सकाळ पासूनच शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती, काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटायला येतो आणि पुढेही येत राहु, गेली 12 वर्षे शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे यानिमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो, कारण “साऱ्या महाराष्ट्राचा भार तो वाहतो, होय आमचा विठ्ठल बारामती राहतो.   अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट भोर तालुका युवक अध्यक्ष गणेश खुटवड यांनी व्यक्त केले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!