संगमनेर-माळवाडी ग्रामपंचायत राजीनामा दिलेल्या सदस्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे : सरपंच सौ.सायली साळुंके
संगमनेर : दि. 2/10/24 (बुधवार) भोर तालुक्याच्या भाटघर धरणा शेजारी असलेल्या संगमनेर-माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या 9 सदस्य पैकी 5 सदस्यांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिले होते. संगमनेर-माळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच आणि उपसरपंच यांनी इतर सदस्यांना विचारात न घेता काम करत, असल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या सदस्यांनी केला होता.
दि. 30/9/24 ला ग्रामपंचायत मासिक सभेत झालेल्या बैठकीत एकूण 5 सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्या पैकी 5 सदस्यांचे राजीनामे पात्र ठरवण्यात आले. त्यापैकी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार यांनी जनहिताचा विचार करत मतदारांचा आदर राखत राजीनामा मागे येण्याचा निर्णय घेतला. उर्वरित चार सदस्यांचे राजीनामे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत मंजूर करून पुढील कार्यवाही करिता वरिष्ठांकडे पाठवले आहेत.
9 पैकी 5 सदस्यांमुळे बहुमत सिद्ध झाले. यामध्ये सरपंच सायली महेंद्र साळुंके, उपसरपंच प्रमोद दशरथ बांदल, सदस्य शर्मिला संतोष लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य लता सुरेश खामकर, आणि अनिल भगवान पवार यांचा समावेश आहे.सरपंच, उपसरपंच, इतर सदस्य व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी या सदस्यांना मासिक सभेला किंवा इतर कोणत्याही निर्णय प्रक्रियेत बोलवले असता ते येत नव्हते, गेली 8 महिने कोणत्याही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेस हे राजीनामा देणारे सदस्य उपस्थित राहत नव्हते, ग्रामपंचायत नियमा प्रमाणे तसे ही त्यांचे सदस्यत्व रद्द होईल याचीही कल्पना त्यांना होती.
सरपंच पदाची महत्वकांक्षा असल्यानेच राजीनामा देऊन दबाव टाकण्याचा केविलवाणा प्रकार या मंडळींनी केला, नुकताच संगमनेर ग्रामपंचायतील महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून देण्यात येणारा तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, परंतु काही महत्वकांक्षी मंडळी गावाच्या विकासाच्या आड येत आहेत,
सरपंच आणि उपसरपंच पदाच्या लालसेपोटी हा सर्व प्रकार घडल्याचा उघडकीस आला आहे. यामुळे गावच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याच्या आधीच ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार यांच्या प्रसंगावधानामुळे विकासाच्या भूमिकेतून ग्रामस्थांच्या आणि विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्या पाठीशी राहणार आशी भूमिका जाहीर करुन त्यांनी दिलेला राजीनामा परत घेत असल्याचे जाहिर करताच त्याच्या वॉर्डमधील मतदार व ग्रामस्थांनी त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले.
स्वराज महाराष्ट्र न्यूजशी बोलताना विद्यमान सरपंच सौ.सायली साळुंके यांनी सांगितले की गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत गावात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक विकास कामे मार्गी लावली. एक महिला आणि गावची प्रथम नागरीक म्हणून भूमिका बजावत असताना नाहक आरोप केले परंतु एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत,आणि गावातील सर्वच विकास कामांच्या आड येण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. परंतु उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्यामुळेच गावाच्या विकासासाठी नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला, मी व माझे सर्व सहकरी पुढील काळात देखील विकास कामे अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे, गावातील कुठल्याच घटकावर अन्याय होऊ देणार नाही, विरोधक असले तरी ही त्यांनी गावाच्या विकासा करिता काही कामे सुचवली किंवा सुचना केल्या तरी त्याबाबत आम्ही सरपंच, उपसरपंच सदस्य योग्य तो विचार करु.




