राजकीय

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मॅनेजरवर निलंबनाची कारवाई


पुणे : दि. 11/4/24  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेला बारामती लोकसभा मतदार संघात राजकीय भविष्याच्या दृष्टीने शरद पवार व अजित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून, बारामती मतदार संघ कुठल्या पवारांचा बालेकिल्ला आहे, हे येत्या 4 जूनला निकाला नंतरच स्पष्ट होईल.

Advertisement

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात बऱ्याच ठिकाणी पैसे वाटप केल्याचे आरोप केले होते, तसेच त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट केले होते, काही व्हिडिओ मध्ये गाडीत नोटा पडल्याचे दिसत होते, तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये रात्रीच्या वेळी बारामती मधील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडे असल्याचे दिसून येत आहे, दुसऱ्या व्हिडिओ मधील बारामतीच्या याच बँकेतून पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. जी बँक गरिबांना सायंकाळी पाच नंतर बंद असते, तिच बँक मध्यरात्री चालू कशी काय ?

या आरोपाची निवडणूक आयोगाने दखल घेत बँक मॅनेजरचे निलंबन केले आहे, याच बँकेत मध्यरात्री 45 ते 50 कर्मचारी किंवा सबंधित पक्षाचे पदाधिकारी असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे,  तसेच या प्रकरणांमध्ये मॅनेजर दोषी असल्याचे आढळून येत आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!