भाटघर धरणग्रस्त शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
भोर प्रतिनिधी, स्वप्निल सावंत
भोर : भाटघर धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या सुमारे 40 गावात धरणग्रस्तांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत असुन पाणी खाली सोडल्यामुळे धरणातील पाणी अजुन खोलवर गेले असल्याने पाणी पिण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या 20 ते 25 पाळीव जनावरे गाळामध्ये अडकल्याने दगावली आहेत, तसेच पिण्याचे पाणी धरणांमध्ये 3 ते 4 किलो मिटर खोलवर आत असल्याने पाणी आणण्यासाठी गावातील महिला व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे.
Advertisement
- पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता,परंतु ही माहिती प्रशाकीय अधिकारी डोंगरे साहेबांनी वरिष्ट अधिकारी तसेच पाटबंधारे विभागाशी संबंधित अधिकारी यांच्याशी फोन वरून चर्चा केली व आजचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली, व 12 तारखेला संबंधित अधिकारी व धरणग्रस्त शेतकऱ्यानंमध्ये विशेष मिटींग घेऊन मागणीचा योग्य विचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गवळी सो. पो.अमलदार निंबाळकर, पो.अमलदार माने,पो.अंमलदार घुले,पो. अंमलदार गव्हाणे इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
तसेच धरणग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष-सचिन बांदल,सचिव-काळुराम मळेकर, कार्याध्यक्ष-अंकुश खंडागळे, सदस्य- विट्ठल वरखडे,आत्माराम धुमाळ,जितु मालुसरे,सोमनाथ वचकल,ढोबे पाटील व इतर 25 सदस्य उपस्थित होते.
Advertisement




