राजकीय

संविधान बदलणाऱ्याला फाडुन टाकीण : केंद्रिय मंत्री रामदास आठवले


पुरंदर : सासवड येथील माऊली मंगल कार्यालय येथे महायुतीचा मेळावा झाला त्यामध्ये केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले बोलत होते, संविधान कोणच बदलु शकत नाही आणि कोणी तसं केलं तर मी त्याला फाडुन टाकीण.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानामुळेच पंतप्रधान झाले आहेत, ते संविधान विरोधी लोकांना पाठीशी घालणार नाहीत, कॉग्रेस जाणुन – बुजुन महायुतीचे सरकार आल्यावर संविधान बदलणार आहेत असा अपप्रचार करत आहेत, त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान केले.

पुढे बोलताना ते म्हणाले अजित पवार यांची काम करण्याची पध्दत अख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मुळात ते चुकीचे काहीच काम करत नाहीत, आपण झोपेत असतो तेव्हा हा माणुस प्रत्यक्ष काम चालु असले त्याठिकाणी जाऊन पाहणी करत असतो, तसेच प्रशासनावर सर्वात जादा पकड असेल तर ते अजित पवार यांचीच आहे.आणि त्याच्या सौ. सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या रिंगणात आहेत, तरी अफवांनवर विश्वास न ठेवता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बहुमतानं निवडुन आणायचे आहे,असे आव्हान त्यांनी मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

Advertisement

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पुणे जिल्हा प्रदीप गारटकर,पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपा नेते  ताकवले,राष्ट्रवादीचे नेते महेश शिंदे, भाजपाचे बाबाराजें जाधवराव, शिवसेना नेते आबा यादव, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,आरपीआय नेते परशुराम वाडेकर,आरपीआय पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार,आरपीआय युवा अध्यक्ष पुणे जिल्हा प्रवीण ओव्हाळ, आरपीआय नेते प्रदीप कांबळे, युवा संघटक मुन्ना गायकवाड, पुरंदर अध्यक्ष पंकज धिवार युवा अध्यक्ष स्वप्नील कांबळे,राजगड (वेल्हा) तालुक्याचे आरपीआय अध्यक्ष कुंदन गंगावणे.

भोर तालुका सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अविनाश गायकवाड,भोर तालुका आरपीआय अध्यक्ष सुनील गायकवाड, युवक अध्यक्ष स्वप्निल सावंत,आरपीआय एकतावादीचे भोर ता. अध्यक्ष नवनाथ कदम, कार्याध्यक्ष सुनील मोरे, महेंद्र सपकाळ, भाऊ पारठे, रवि कांबळे. भोर तालुक्यांतून महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!