भोसरी मतदार संघाचा तिढा सुटला : महाविकास आघडीकडून अजित गव्हाणे रणांगणात
भोसरी विधानसभा मतदारसंघात काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातुन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करणारे अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोसरीतून अजित गव्हाणे यांची उमेदवारी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असतानाच महाविकास आघाडीत भोसरी मतदारसंघाचा तिढा सोडवला आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे असून त्यांना महायुतीकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाकडून उमेदवार असून या मतदारसंघात मोठा सामना बघायला मिळणार आहे. अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिल्यामुळे भोसरीमध्ये महाविकास आघाडीने भाजप समोर तगडे आव्हान उभे केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघाच्या तुलनेत भोसरी मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मतदार संघाचा वेळोवेळी आढावा घेत असतात, अजित गव्हाणे यांनी प्रवेश केल्यापासून भोसरी मतदारसंघ पिंजून काढून प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षात झालेल्या विकासाच्या कामाबाबत, आलेला निधी त्याचा वापर, खोटे केलेले दावे, झालेला खराब रस्ता, मतदार संघातील वेगवेगळ्या विषयावर पाठपुरावा न करणे,पावसाळ्यात होणाऱ्या इतर समस्या, झालेला भ्रष्टाचार, पक्षातील नाराज असणारी मंडळी, अशा अनेक गोष्टी मतदारांसमोर मांडण्याचे काम अजित गव्हाणे यांनी केले आहे,
अजित गव्हाणे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघात आजी- माजी नगरसेवकांचा वाढता पाठिंबा, तरुण वर्गामध्ये त्यांची असणारी प्रतिमा, महिला भगिनींसाठी केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू आहे, आतापर्यंत प्रचारामध्ये मतदारांना भेटण्याच्या त्यांच्या 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, यावेळी मतदार संघात महाविकास आघाडीने अजित गव्हाणे यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक भाजपा करीता सोपी राहिलेली नसल्याचे बोलले जात आहे.




