राजकीय

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणूका पुन्हा लांबणीवर : सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील तारीख 25 फेब्रुवारी


 

दिल्ली : दि. 28 जानेवारी 2025 मंगळवार आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व OBC आरक्षण याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता होती. परंतु पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुढील तारीख दिली असून पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Advertisement

OBC आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. आज न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. OBC आरक्षण असो की नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी केली होती,या प्रकरणी आज सुनावणी झाली असून न्यायालयाने 25 फेब्रुवारी ही नवी तारीख दिली आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार जर 25 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत स्थगिती उठल्यास एप्रिल-मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच राजकिय पक्ष व इच्छुकांचे लक्ष वेधलं आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!