ताज्या घडामोडी

भोर एसटी स्टँडच्या कामाची पाहणी करुन समस्या निवरणासाठी ST डेपो अधिकारी, प्रवाशी व विद्यार्थी यांच्याशी आमदार शंकर मांडेकर यांचा संवाद


 

भोर : दि. 28 जानेवारी 2025 मंगळवार आमदार शंकर मांडेकर व पुणे जिल्हा माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी भोर एस.टी. ST स्टँडची पाहणी करून चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला. प्रवाशांच्या मुलभूत सुविधामध्ये वेटींग जागा, महिलांसाठी समर्पित वेटिंग एरिया, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय याबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Advertisement

तसेच ड्रायव्हर आणि कंडक्टरना विश्रांतीची योग्य सुखसुविधा, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी समजून घेण्यात आल्या.रोजच्या प्रवासासाठी सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचा निर्धार केला आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजना त्वरित राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की भविष्यात विद्यार्थी आणि प्रवाशांच्या समस्यांवर परिणामकारक तोडगा काढून प्रवास अधिक सोयीचा व सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!