सामाजिक

ग्रामीण रुग्णालय राजगड (वेल्हा) मधील डॉक्टरांना देवाची उपमा


राजगड :आत्ताचा राजगड पूर्वीच्या वेल्हा येथील सरकारी रुग्णालयातील स्वच्छता खरोखरंच वाखण्याजोगी आहे,

रुग्णालयातील आया,मावशीबाई सतत झाडुन घेत असतात, फरशा पुसत असतात. रुग्णालयाच्या भिंती,कोपरे इतर रुग्णालया प्रमाणे थुंकून रंगवलेल्या दिसुन येत नाहीत, कोपऱ्या कोपऱ्यात देवाचे फोटो लावुन धार्मिकतेचा आधार घेतला जात नाही. इतरत्र नजर टाकली असता अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचाराबाबत समाधान व्यक्त करत असतात. यारुग्णालयामध्ये रुग्णांना सर्व आधुनिक सुविधा पुरवल्या जातात.

राजगड (वेल्हा) तालुक्यातील उपचार घेणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक डॉक्टराना देवाची उपमा देत असतात ती उगाच नाही, डॉक्टर जीवाचे रान करून रुग्णांचे जीव वाचवत असतात.

Advertisement

येथील एक वशिष्ठ आहे वैद्यकीय अधीक्षक असो किंव्हा इतर सेवक सर्वजण आप-आपल्या कामाच्या वेळेत येतात आणि जातात.

वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पांचाळ,सहाय्यक ज्ञानेश्वर कांबळे,इन्चार्ज प्रियंका आब,डॉक्टर भोईटे,डॉक्टर शिवाजी,सफाई कामगार नितीन भगत,किरण गायकवाड,कपिल गायकवाड, येथील सर्वच सेवेकरी मावश्या, वार्डन, सिक्युरिटी गार्ड, ॲम्बुलन्स ड्रायव्हर इतर सेवेकरी यांचे स्वराज महाराष्ट्र न्यूजच्या वतीने अभिनंदन व आभार…

आपणां सर्वांकडून येणाऱ्या सर्व रुग्णांची उत्तमा – उत्तम सेवा घडो…

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!