सामाजिक

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडुन महिला भगिनींना सुवर्णसंधी


पुणे: महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा बँकेत केवळ शंभर रुपयांत नवीन खाते उघडुन मिळणार आहे,’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेसाठी बँक संचालक मंडळांनी अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 2 दशके जिल्हा बँकेचे कामकाज यशस्वीरित्या चालु असुन त्यांच्या सुचनेनुसार राज्य सरकारच्या घोषित योजनेचा लाभ मिळण्यासाठी नवीन खाते उघडण्याची सुविधा बँकेत देण्यात येत आहे.

Advertisement

जिल्हा बँकेच्या एकुण 294 शाखा आहेत,महिलांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत केवळ 100 रुपयांत खाते उघडण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रातील पहिलीच जिल्हा बँक आहे,तरी जिल्हा बँकेतील कोणत्याही शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील सरकारच्या योजनेतील रक्कम जमा करून लाभ घेता येईल,

अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी तमाम महिला भगिनींना केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!