शिक्षण

छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी येथे वृक्षारोपणाचा सोहळा साजरा


किकवी :  छत्रपती शिवाजी किकवी,ता,.भोर,जि,.पुणे या शाळेमध्ये दि. 5/7/2024 (शुक्रवार) रोजी वृक्षारोपणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता,या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून निसर्ग प्रेमी व संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत कोंढाळकर होते, त्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी शाल श्रीफळ आणि सोबतच पुष्पगुच्छ देऊन केले.

वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता, यामध्ये शिक्षक विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती, कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी व तयारी सर्व शिक्षक गण तसेच विद्यार्थी यांनी पार पाडली,वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जवळच्या नर्सरीतुन विविध प्रकारचे झाडे मागवण्यात आली होती.

Advertisement

विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक मध्ये ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या संत अभंगा प्रमाणे वृक्षांचे महत्त्व आमच्या जीवनात अनन्य साधारण आहे. निसर्ग आपले आरोग्य जपतो. मग साहजिकच निसर्गाची जपणूक ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यक्रमात देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व सांगून प्रत्येकाने झाडाचे संवर्धन करण्याबाबत आव्हान करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत कोंढाळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र निगडे, सचिव राजेंद्र भोसले, संचालक राजेंद्र कोंढाळकर, प्रितम घारे, मौलाउद्दिन शेख, दिनेश लाळे, सचिन निगडे, प्रमोद भालघरे, बाळासाहेब राऊत, योगेश जाधव तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी मिलिंद मगर यांनी सूत्रसंचालन केले.

आलेल्या सर्व पाहुण्यांचा विद्यालयाच्या वतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वृक्षारोपणसाठी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच,उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, तरुण मंडळ तसेच प्रितम घारे, सचिन निगडे, निलेश लाळे, रवी मोरे यांनी मदत केल्या बद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!