शिक्षण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवत येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


भोर  : ७९ वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवत येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला कऱण्यात आला, यावेळी सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक रमेश चंदनशिव व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत चंदनशिव यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत व शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून किवत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या यशस्वी युवकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये यश चंदनशिव यांनी वकिली पदवी संपादन केल्याबद्दल व जर्मनी येथे एम एस ची पदवी संपादन केल्याबद्दल आकाश रमेश चंदनशिव यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते कऱण्यात आला.

यावेळी शिक्षणाबद्दल आस्था असणारे शैक्षणिक विकासात आपले योगदान देणारे गावचे सेवानिवृत्त बँक मॅनेजर भानुदास चंदनशिव व माजी उपसरपंच राजेंद्र काशिनाथ चंदनशिव यांच्या सौजन्याने गणित विषयात उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या इयत्ता चौथी प्रथम क्रमांक आशिष कुमठे ३००० रुपये, द्वितीय क्रमांक प्रेरणा पंकज चंदनशिव २५०० रुपये तृतीय क्रमांक स्वरा महेश चंदनशिव १५०० रुपये इयत्ता सातवी प्रथम क्रमांक ईश्वरी प्रदीप चव्हाण ३००० रुपये द्वितीय क्रमांक आसावरी रमेश पवार २५०० रुपये तृतीय क्रमांक हर्ष नितीन चव्हाण १५०० रुपये व स्कॉलरशिप मध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेले आठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००० रुपये असे एकूण १४ विद्यार्थ्यांना २२००० रुपये प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आली. व अमृता संतोष चंदनशिव इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती, मंथन स्पर्धा परीक्षा, नवोदय परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवल्याबद्दल या विद्यार्थिनीचा विशेष सन्मान करण्यात आला.

Advertisement

ग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना दीडशे वह्याचे मोफत वाटप करण्यात आले, तसेच यावर्षी शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचेही स्वागत व सन्मान करण्यात आला. निरोगी आरोग्याची जीवनशैली याबद्दल दिपक चंदनशिव यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले, रामचंद्र चंदनशिव व चंद्रकांत चंदनशिव व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज चंदनशिव,मंगेश चंदनशिव, सागर धापते ,सलीम मुजावर, ओमकार घाडगे, चंद्रकांत पवार, यासर्व मान्यवरांकडून ग्रामपंचायत व गावातील इतर ग्रामस्थ यांच्याकडून विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे, फळे, चिक्की राजगिरा लाडू वाटप करण्यात आल

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावचे सरपंच तानाजी चंदनशिव उपसरपंच आबासाहेब कुमठे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम नाना चंदनशिव, माजी उपसरपंच राजेंद्र चंदनशिव, पोलीस पाटील सचिन पवार ,विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रामचंद्र चंदनशिव यांनी प्रयत्न केले.

यावेळी समाज कल्याण पुणे जिल्हा उपाध्यक्ष वसंत मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज चंदनशिव, उपाध्यक्ष रोहिदास चंदनशिव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक ,गावातील जेष्ठ मान्यवर, ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ, माता-भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!