सामाजिक

कापूरहोळ ग्रामपंचायतीचा हायटेक कारभार : गावाची झेप डिजिटल युगाकडे


 

कापूरहोळ : ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, नागरिकांचा बऱ्याच गोष्टी घरबसल्या मिळाव्यात, या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकसित केलेल्या डिजिटल कर प्रणालीचा कापूरहोळ ग्रामपंचायतीने अवलंब केला आहे. स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी डिजिटल ग्रामपंचायतीचे (Digital Gram Panchayt) सरपंच मंगल गाडे व उपसरपंच रविंद्र ऊर्फ पंकज गाडे यांच्या हस्ते अनौपचारिक कर वसुली प्रणालीच्या क्यूआर कोडचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामपंचायतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा (Digital Technology) अवलंब करीत घर क्रमांका ऐवजी ‘क्यूआर कोड’द्वारे करवसुली (Tax Recovery) करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक घराच्या दर्शनी भागात लावलेल्या क्यूआर कोडद्वारे (QR Code) घरपट्टी व पाणीपट्टी (Water Tax) भरणा केला जाणार आहे. कर भरण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली राबवणार आहे.

डिजिटल ग्रामपंचायत मधुन नागरिकांना मिळणारे फायदे

१) ग्रामपंचायत ऍप – गावकरी ऍपच्या माध्यमातून त्यांची ग्रामपंचायत निवडू शकतात आणि आवश्यक माहिती मिळवू शकते.

२) ऑनलाइन कर भरणा – नागरिक त्यांच्या सोयीनुसार ऑनलाइन कर भरू शकतात, जसे की क्यूआर कोड स्कॅन करून.

३) सरकारी योजनांची माहिती – विविध सरकारी योजनांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होते.

Advertisement

४) गावातील विकासकामांची माहिती – गावातील विकासकामांची माहिती, तसेच त्यासंबंधीचे अपडेट्स नागरिकांना मिळतात.

५) शेतीविषयक माहिती – शेतकऱ्यांसाठी बाजारभाव, हवामान अंदाज आणि इतर कृषीविषयक माहिती उपलब्ध करून दिली जाते.

६) ई-प्रशासन – ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने केले जाते.

याबाबत मार्गदर्शन करताना ग्रामविकास अधिकारी संजय वाकळे यांनी डिजिटल ग्रामपंचायत गरजेची का असते याबद्दल माहिती दिली.

पारदर्शकता : कामकाजात पारदर्शकता येते.

सुविधा : नागरिकांना विविध सुविधा जलद आणि सहज उपलब्ध होतात.

कार्यक्षमतेत वाढ : कामकाजात कार्यक्षमतेत वाढ होते.

खर्च कमी :  प्रशासकीय खर्च कमी होतो.

यावेळी सरपंच मंगल गाडे, उपसरपंच पंकज गाडे, ग्रामपंचायत सदस्य रोहित जगताप, प्रज्ञा म्हस्के, ग्रामपंचायत कर्मचारी सुप्रिया बांदल, शुभंगी धुमाळ, आकाश गाडे, तसेच सोसायटीचे माजी चेअरमन वसंत गाडे, माजी उपसरपंच गुलाब गाडे, उद्योजक रविंद्र गाडे, भोर तालुका बाजार समिती सदस्य दत्ता बाठे, सय्यद शेख, विशाल दळवी या मान्यवरांसह गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी व महिला भगिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!