सामाजिक

मयत तसेच दहावा वेळीचे भाषण बंद करा, उरुळी कांचन ग्रामस्थांची बॅनर द्वारे मागणी


उरूळी कांचन : दि.9/7/2025 (बुधवार) उरुळी कांचन ता.हवेली जि.पुणे ग्रामस्थांच्या वतीने मयत किंवा दहाव्याच्या वेळी लोकनेत्याची होणारी लांबलचक भाषणांमुळे वैतागून स्मशानभूमी परिसरात भाषण बाजी बंद करण्यासाठी स्मशानभुमी तसेच अन्य 3 ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

मयत किंवा दहावा हा त्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो.त्यात लांबलचक श्रद्धांजलीच्या भाषणामुळे जमलेल्या लोकांना ताटकळत थांबावे लागते, लोकनेत्यांच्या या सवयीचा परिसरातील अनेक गावांमध्ये नागरिकांना त्रास होत आहे, ही भाषणबाजी लवकरात थांबवावी अशी मागणी ग्रामस्थ व परिसरातील नागरिक करत आहेत.

Advertisement

निवडणुका तोंडावर आल्यावर तर अशा भाषण करणाऱ्यांना जोरच येतो,राजकीय भाषण करण्यासाठी अनेक व्यासपीठ आहेत,तरीपण अशा ठिकाणी लोकांना जमा करायची गरज नाही, लोकांचा मोठा जनसमुदाय समोर असतो, आयता माईक असतो, साऊंड सिस्टिम असते, एवढे सगळे फुकट मिळाल्यावर यांना भान राहात नाही,अशी काहीशी परिस्थिती उरळी कांचन तसेच आजूबाजूच्या गावात देखील पाहायला मिळत आहे, लोकांना भाषणांच्या वाढत्या वेळामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची देखील भेट घेता येत नाही,अशा लोकांना कसलेच भान नसते,उलट दनादन भाषण ठोकत आहेत,असल्या प्रवृत्तीचा ग्रामस्थ निषेध करत आहेत, तसेच ही भाषण प्रथा बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!