शिक्षण

ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचा भक्तीमय वातावरणामध्ये पावसासोबत बाल वारकऱ्यांचा रंगला पालखी दिंडी सोहळा


कापुरहोळ : दि.12/7/2024 (शुक्रवार) सालाबाद प्रमाणे ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी,ता.भोर,जि.पुणे येथील शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारशाची जाण आसावी त्याचबरोबर दिंडीतील सर्वांच्या सहभागातून धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या संविधानात्मक तत्वांतून राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी व त्यांच्यात अंगीभूत असणारी उपक्रमशीलता वाढीस लागावी या हेतूने आषाढी एकादशी निमित्त या दिंडीचे आयोजन करण्यात आले.

आषाढीवारी “वारी एक नव्या सुरूवातीची, नव्या आशेची, नव्या संकल्पाची, नव्या प्रवासाची, सुरक्षतेची, आणि चांगल्या आरोग्याची.पालखी सोहळ्याद्वारे समाजाशी जवळीक वाढावी व संत परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने दिंडी काढली होती,शाळेतील बालवारकऱ्यांनी अवघे गाव भक्तिमय व ज्ञानमय केले.पावसातील सर्वांच्या उत्साहाने अवघा परिसर भक्तीमय झाला होता.

Advertisement

ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवीच्या मैदानापासून निघालेल्या या दिंडीत प्रारंभी भगवा ध्वज घेऊन नाचणारे बालवारकरी, त्यांच्यामागे विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिरुपातील विद्यार्थी,नंतर टाळकरी,मध्येच मृदंगवादक,विणेकरी व डोक्यावर ग्रंथ,तुळशी घेऊन आलेल्या बालमहिला वारकरींसह सर्व विद्यार्थी ‘विठूनामाचा’ जयघोष करीत,’सोपे वर्म आम्हा सांगितले संती ! टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा!’या उक्तिप्रमाणे पाऊल खेळत कापूरहोळ गावातील जानुबाई मंदिरा जवळ ही दिंडी स्थिरावली.गावातील ग्रामस्तांनी,हरिभक्तांनी,आणि पालक वर्ग यांनी बालवारकऱ्यांना खाऊ वाटप केला.
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य उमेश सोनवले सरांनी सर्वाना मार्गदर्शन केले,ते दरवर्षी कापूरहोळ गावी त्यांच्या शाळेची दिंडी घेऊन येत असतात,यवर्षी शाळेच्या शिक्षक,व इतर कर्मचाऱ्यांनी कापूरहोळ ग्रामस्थांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यअभिषेक दिनाची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.
या दिंडी सोहळ्यानिमित्त गावातील सरपंच सौ.मंगल गाडे,उपसरपंच पंकज गाडे, विट्ठल मंदिराचे मा.अध्यक्ष तुकाराम गाडे,गोरक्ष अहिरे,समीर गाडे,रामदास लेकावळे,सागर गाडे,किरण बोरगे,आकाश गाडे,अभिजीत गाडे,विकास गाडे,मालाराम चौधरी,निलेश देवघरे,अविनाश निगडे,राजेंद्र वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

विठ्ठलाचा सोहळा अनेकांना अनुभवता येत नसल्याने शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांना पंढरपूर अनुभवण्यासाठी दिंडी सोहळा आयोजित केला होता,या सोहळ्यासाठी सौ.निर्मला म्हस्के,सौ.ऊर्मिला लेकावळे,सौ.सविता गाडे,सौ.सिमा गाडे,सौ.तृप्ती राऊत,सौ.रसिका निंबाळकर,सौ.स्मिता गाडे,सौ.मोना,सौ.स्वाती वाघमारे या महिला हरीभक्तांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!