विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा
भोर : शनिवार १४ सप्टेंबर रोजी विद्या प्रतिष्ठान भोर, इंग्लिश मिडीयम स्कूल, भोर येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.इयत्ता १ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपली कल्पकता व कलागुण सादर केले.
इयत्ता १ ते ४ मधील विद्यार्थ्यांनी प्राण्यांची माहिती, आठवड्याचे दिवस, फुलांची नावे, मात्रांचे चित्र, व्याकरणाचे झाड, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, लिंग, म्हणींचे चार्ट, पर्यायवाची शब्द तसेच प्राणी व पक्ष्यांची नावे अशा विविध उपक्रमांतून सहभाग घेतला.
इयत्ता ५ ते १० मधील विद्यार्थ्यांनी अभिवादन लेखन, कागद व कापडी पिशव्यांची निर्मिती, पर्यावरण संरक्षणावरील घोषवाक्य लेखन, पोस्टर तयार करणे व निबंध लेखन या उपक्रमांतून आपले विचार व्यक्त केले.या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व पटले तसेच त्यांचे ज्ञान, सर्जनशीलता व सामाजिक जाणीवा अधिक दृढ झाल्या.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी मादगुडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आशा प्रकारे हिंदी दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.




