शिक्षण

आत्मनिर्भर भारतासाठी पहिले बलिदान देणारे हुतात्मा बाबू गेनू सैद यांचा स्मृतिदिन घोडेगावच्या प्राथमिक शाळेमध्ये साजरा


घोडेगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे आत्मनिर्भर भारतासाठी पहिले बलिदान देणारे हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या बलिदान दिनानिमित्त 12 डिसेंबर हा दिवस स्वदेशी दिन म्हणून साजरा करण्याचं आला.

बाबू गेनू सैद हे नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य करत होते, मुंबई येथे गिरणीत कामाला होते, उदरनिर्वाह करीत असताना त्यांच्या मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. 1930 साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले होते.

12 डिसेंबर 1930 रोजी विदेशी कपडे घेऊन एक ट्रक आला, दुकानाकडे जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला असता पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच  आडवे पडून राहिले, ते ट्रक पुढे जाऊ देत नव्हते एका निष्ठूर इंग्रज ड्रायव्हरने तो ट्रक या 22 वर्षाच्या तरूणाच्या अंगावरून पुढे नेला आणि बाबू गेनू सैद यांना हुतात्म्य लाभले.

Advertisement

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत भाऊ काळे, बि.डी काळे, महाविद्यालयाचे माजी शारीरिक शिक्षण संचालक श्री.भाऊसाहेब थोरात सर,आंबेगाव तालुका शाहीर संघटनेचे अध्यक्ष शाहीर श्री.सखाराम घोडेकर,आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे मा.सभापती राजाराम काथेर,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका चासकर, उपशिक्षिका श्रीमती सुनिता काठे, श्रीमती ललिता शेळके, श्रीमती नंदा काठे, श्रीमती आशा केवाळे, श्रीमती स्वाती मंदावार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

• शाहीर सखाराम घोडेकर बाबा यांनी हुतात्मा बाबू गेनू सैद यांचा पोवाडा गाऊन दाखवला.

• कुमारी आरोही दिनेश आकले या विद्यार्थिनीने तिच्या वाढदिवसानिमित्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांची प्रतिमा शाळेला भेट दिली.

आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती राजाराम काथेर यांनी हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्याबद्द्ल  माहिती दिली व स्मृतिदिनांनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!