शिक्षण

15 जुन पासुन सरकारची महाराष्ट्रात एक राज्य – एक गणवेश योजना.


 

शैक्षणिक वर्ष 2024 – 2025 वर्षीपासून राज्यातील शासकीय शाळेत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना शिक्षण विभागा कडुन देण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष 2024 2025 पासून पात्र विद्यार्थ्यांना एक राज्य, एक गणवेश ही योजना केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. 1 ली ते इ. 8 वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषे खालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

सन 2024 – 2025 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एक समान एका रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इ. 1 ली ते इ. 8 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2024 – 2025 या शैक्षणिक वर्षापासून एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन मुला – मुलींना उपलब्ध करून देण्याची सुचना देण्यात आल्या आहेत.

1) सन 2024 – 2025 या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. 1 ली ते इ. 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे.

Advertisement

2) सदर नियमित गणवेश आणि स्काऊट व गाईड विषयास अनुरूप मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट / फुल पॅन्ट  तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची अशा स्वरूपात गणवेशाची रचना असेल त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्ट वरती शोल्डर स्ट्रिप (Shoulder Strip) व दोन खिसे (Double Pocket) असणार आहे.

3) प्रस्तुत योजनेंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रंग, एक दर्जा असलेला सारख्याच गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई- निविदा प्रक्रियेचा मसुदा तयार झाला असुन, त्यासाठी आवश्यक त्या विभागांचे मार्गदर्शन घेऊन, ई-निविदा प्रक्रिया राबविली आहे, सर्व संबंधितांचा समन्वय राखण्याकरीता उपाययोजना करणे आदीबाबतची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात येत आहे.

4) सदर गणवेशाच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालय करत आहे.

5) प्रस्तुत योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत समान रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मोफत गणवेश योजनेबाबत संबंधित शाळा तसेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही कराण्यात येऊ नये.

6) सन 2024 – 2025 या शैक्षणिक वर्षापासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने घेतलेल्या निर्णया प्रमाणे आवश्यक ती सर्व कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात आली असुन, प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 20231018180457 असा आहे,असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!