राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 25 वा वर्धापन दिन अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पर्टीच्या 25 वा वर्धापन दिन साजरा करताना आपल्या भाषणात अजित पवार भावुक झालेचे दिसुन आले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्षम नेतृत्व शरद पवार यांनी सलग 24 वर्षे समर्थ पणे जबाबदारी पार पाडली, शरद पवार साहेबांनी पक्षाकरिता भरपूर काही केले, काही ज्येष्ठ मंडळी आपल्याबरोबर नसल्याची खंत ही त्यांनी सांगितली. सुनील तटकरेचे आभार मानले,त्यांनी काही प्रमाणात पक्षाचे लाज राखली.
लोकसभामध्ये मराठा आरक्षण, सगेसोयरे मुद्दा,कांदा निर्यात बंदी, संविधान बदलण्याची अफवा या सर्व गोष्टींचा परिणाम झाला, येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण मोठा विजय मिळवू सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस स्वतः पार्टी ऑफिसमध्ये बसून थोड्याभरातील कामांच्या आढावा घेणे. पक्षाच्या विस्तार वाढीसाठी लागणारी जी काही यंत्रणा, यंत्रसामग्री पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील असा पक्षाने निर्णय घेतला असुन सुविधा, यंत्रसामग्री उपयोग फक्त पक्ष वाडी करताच हवा खाजगी आयुष्यातील कामाकरिता नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जरी महायुतीमध्ये असलो तरी आपण शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा कोठेही सोडलेले नाही, तसेच विरोधकांनी संविधाना बाबत जो अपप्रचार करत असून जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत संविधान राहील. कोणताही मायका बदलु शकत नाही.




