राजकीय

मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी.


पुणे प्रतिनिधी,

दि. 9/06/25 (रविवार) पुणे लोकसभा मतदार संघातुन पहिल्यांदाच निवडुन आलेले नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना अचानक केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली.

मुरलीधर मोहोळ हे पैलवान असुन ते 4 वेळा नगरसेवक व पुण्याचे महापौर राहिले आहेत, ते रविवारी सकाळी झोपेत असताना त्यांना वरिष्ट पदाधिकारी यांनी फोन केला की आज संध्याकाळी नरेंद्र मोदी मंत्री मंडळामध्ये तुम्हांला मंत्री म्हणुन शपथ घ्यायची आहे, हा त्यांना एक सुखद धक्काच होता.

Advertisement

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की पुणेकरानी मला दिलेला हा आशीर्वादच म्हणावा लागेल, मला मिळालेला हा बहुमान सर्व पुणेकराचा असुन मी एक सेवक आहे. पुण्याला तब्बल 30 वर्षांनंतर केंद्रिय मंत्रीपद मिळाले आहे, मंत्रिमंडळामध्ये कोणतेही खाते मिळो मी प्रामाणिकपणे त्या खात्यात काम करुन त्या खात्यास न्याय देईल. माझी जबाबदारी वाढली असुन मी पुणेकारणांचा कायम ऋणी राहील.

 

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!