राजकीय

बारामती लोकसभेची जागा मीच जिंकणार : नामदेवराव जाधव


कापुरहोळ : संपुर्ण देशाचे लक्ष लागलेला लोकसभा मतदार संघ म्हणजे बारामती कारण येथे दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, अजित पवारांनी बंड केल्यामुळे निर्माण झालेलं आव्हानाला शरद पवार समोर जात असताना त्याच्या पुढे अजुन एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे, ते म्हणजे जिजाऊचे थेट वंशज इतिहास संशोधक नामदेवराव जाधव यांच्या उमेदवारीमुळे. सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांना विजय सोपा नसल्याचे दिसुन येत आहे.

सलग २५ वर्ष लेखन आणि व्यावसायिक मार्गदर्शन करून मराठी तरुणांना व्यावसायिक शिक्षणां बरोबरच रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणारे पाचलिंगेश्वर किकवी ता. भोर येथील मूळचे रहिवासी आणि पुरंदर तालुक्यातील काळदरी गावचे वास्तव्य असणारे कुलगुरू नामदेवराव जाधव हे आता लोकसभेच्या रिंगणात उतरले असुन त्यांनी टेलिफोन चिन्हाद्वारे अपक्ष राहून निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे,

Advertisement

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न असो, किंवा रोजगार, पर्यटन आणि जन सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, तळागाळा पर्यंतच्या सोसल्या जाणाऱ्या प्रत्येक अडचणींना एक अपेक्षित पर्यायी उत्तर देण्यासाठी निवडणूक लढवण्याचा मानस बाळगला असल्याचे त्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जनतेने संधी दिल्यास लोकांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींचा सखोल अभ्यास करून अगदी शेवटच्या माणसापर्यंत आपले कार्य पोहोचवण्याचा मानस आहे, तसेच ४ लाख कुटुंबातील १८ ते ४० वयोगटातील तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन विकास कामांचा शुभारंभ करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या नियोजित कार्यप्रणालीद्वारे मांडले.

शरद पवार घराण्यांच्या विरोधातील सुमारे ५ ते ६ लाख मतदारांना  मध्यंतरी विजय शिवतरे यांच्यामुळे काही प्रमाणात आशा निर्माण झाल्या होत्या परंतु त्यांनी माघार घेतल्याने याविरोधी मतदारांचा भ्रम निरास झाला होता, पण माझ्या उमेदवारीमुळे या मतदारांना सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!