राजकीय

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात


वेळू : पुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा भोर तालुक्यातील चेलाडी (नसरापूर) येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानात मंगळवार दि. १ रोजी सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. अशी माहिती वेळू येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे प्रचार प्रमुख कुलदीप कोंडे यांनी दिली.

यावेळी कुलदीप कोंडे यांनी सांगितले की, सभेस पंचवीस ते तीस हजार लोक येतील, तसेच आजी- माजी पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.वि.सोसायटी चेअरमन, संचालक आणि शिवसेना ( ऊ.बा.ठा.) तील बहुसंख्य कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित  शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहे.
महायुतीच्या उमेदवार आल्याने भोर आणि राजगड तालुक्याचा विकास होणार यासाठी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना निवडून देणार.

भोर एमआयडीसी बाबत कुलदीप कोंडे यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातील त्यांच्या दोन पिढ्यांचा विचार केला जाईल. शेतकऱ्यावर कुठलाही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल

Advertisement

१ मे ला होणाऱ्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात येणार असल्याने ते काय बोलणार याकडे भोर तालुक्यातील जनता, मतदार आणि सर्वच पक्षाचे कार्यकर्ते लक्ष ठेऊन आहेत.

तसेच  ही सभा यशस्वी करण्यासाटी महायुतीच्या नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, आणि या सभेसाठी महायुतीच्या नेते मंडळींनी आप-आपली  कामे वाटुन घेतली आहेत.यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा, शिवसेना ( शिंदे गट ), आर पी आय (आठवले गट ) राष्ट्रीय समाज पक्ष व बाकीचे घटक पक्ष यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, सभा यशस्वी करण्याचा मानस आहे.

तालुक्यातील कोण-कोणत्या पक्षतून कोण बडे नेते फुटणार आणि या सभेत कोण काय – काय बोलणार या कडे भोरच्या जनतेचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेत कुलदीप कोंडे, रणजित शिवतरे, भालचंद्र जगताप,रमेश कोंडे, विक्रम खुटवड, जीवन कोंडे, संतोष घोरपडे, चंद्रकांत बाठे, बाळासाहेब गरुड, दशरथ जाधव, स्वप्नील गाडे,विकास चव्हाण आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!