राजकीय

कसं तात्या म्हणतील तसं


 

योगेश जाधव.

स्वराज महाराष्ट्र न्यूज़ : भोर

 

कसं तात्या म्हणतील तसं
भोर राजगड ( वेल्हे ) तालुक्यात सुप्रिया सुळे यांना शिवसेने (उ.भा.ठा.) गटाचा काडीचा आधार

Advertisement

अति चुरशीच्या चाललेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात प्रतिष्ठेची असलेली निवडणूक सध्या रंगात आली आहे
सुप्रिया सुळे यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात भोर वेल्हे तालुक्यातील किती गावांना भरीव निधी मिळाला आहे.
किती गावांमध्ये खासदार फंडा मार्फत विकास कामे झाली आहे. असा सवाल सध्या भोर वेल्हे तालुक्यात जनता विचारत आहे .
काही दिवसा पूर्वी शिवसेनेचे .कुलदीप कोंडे यांनी मशाल सोडून पुन्हा धनुष्यबाण हाती घेतल्याने .
जवळ जवळ साठ हजार ते पासष्ट हजार मतदार कुलदीप कोंडे यांच्या सोबत गेल्याने भोर व वेल्हे तालुक्यात सुप्रिया सुळे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून हातावर मोजण्या इतके मतदान सुद्धा होणार नसल्याचे .
कट्टर शिवसैनिक सांगत आहे.
कट्टर शिवसेनिक ठाम कुलदीप कोंडे यांच्या बरोबर असल्याचे सांगत असून
वेल्हे तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष दिपक दामगुडे याच्या मागे बोटावर मोजण्या इतके ही शिवसैनिक नसल्याचे वेल्हे येथील कट्टर शिवसैनिक सांगत आहे .
सुनेत्रा पवार यांच्या प्रचार्थी चेलाडी येथे झालेल्या सभेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वेल्हे तालुक्यातील हजारो शिवसैनिक कुलदीप कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला, वेल्हे तालुक्यात फक्त नावाला ठाकरे गट शिवसेना राहिली असल्याचे वेल्हे येथील कट्टर शिवसैनिक सांगत आहे.
यामुळे सुप्रिया सुळे यांना ठाकरे गटाकडून भोर वेल्हे तालुक्यात काडीचा आधार असल्याचे कट्टर शिवसैनिक सांगत आहे .
सध्या भोर वेल्हे तालुक्यात शिवसैनिक म्हणतात,कसं तात्या म्हणतील तसं त्यामुळे सुनेत्रा पवार यांना विजय मतदान हे भोर वेल्हे तालुक्यातील एकनाथ शिंदे शिवसेना गट यांच्या वतीने होणार असल्याची चर्चा भोर वेल्हे तालुक्यातील गावा गावात रंगत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!