पुणे जिल्हा युवासेना संघटक पदी मा.सरपंच विकासबापु चव्हाण यांची निवड
भोर : दि. 18/10/24 (शुक्रवार) रोजी शिवनेरी मंगल कार्यालय वरर्वे येथे युवासेनेचा मेळावा संपन्न झाला.महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि संख्याबळाच्या तुलनेत पुणे जिल्हा हा महत्वाचा आहे. पुण्यातील भोर विधानसभा मतदार संघावर सर्वच पक्षाच्या नेत्यांची नजर असून पुणे जिल्ह्यात संघटन वाढविण्याच्या दृष्टीने युवासेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भोर तालुक्यातील पेंजळवाडीचे मा.युवा सरपंच विकासबापु चव्हाण यांना पुणे जिल्ह्याचे संघटक म्हणुन संधी दिली आहे.
युवासेना संघटक पदी विकासबापु चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर भोर तालुक्यातील युवासेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विकासबापु चव्हाण यांना लहान पणापासून सामाजिक कार्याची आवड आहे, सामाजिक जीवनात वावरत असताना सामाजिक उपक्रम तसेच गोरगरीब माणसाच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी चव्हाण धावून जात असतात, भोगंवली पंचायत समिती गणात त्यांचा नागरिकांशी दांडगा संपर्क आहे, कुलदीपतात्या कोंडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी शिवसेनेत समाज उपयोगी कामे केल्यानेच विकासबापु चव्हाण यांची पुणे जिल्हा युवासेना संघटक पदी नियुक्ती झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नियुक्त्यांवर जोर देत आहे. विकासबापु चव्हाण हा सुशिक्षित तरुण असून त्याच्यावर पुणे जिल्ह्यातील युवकाच्या समस्या, नोकरी, शालेय ऍडमिशन, युवासेनेमध्ये युवकांना जोडो अभियान, पर्यावरण, आणि उच्च शिक्षित तरुणांना युवासेनेत समाविष्ठ करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. महाराष्ट्र युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मंत्री विजयबापु शिवतरे, महाराष्ट्र युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, भोर-राजगड-मुळशीचे युवा नेते कुलदीपतात्या कोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश निगडे, युवासेना जिल्हा अध्यक्ष निलेश घारे, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कुठे, माजी युवासेना तालुका प्रमुख अमित गाडे, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील गाडे, युवती मुळशी तालुका प्रमुख रेणुका रोकडे, मुळशी शिवसेना तालुका प्रमुख दिपक करंजावणे, मुळशी युवा तालुका प्रमुख स्वप्नील सातपुते, भोर शहर प्रमुख नितीन सोनवणे, निगडे गावचे सरपंच किशोर बारणे, पेंजळवाडी गावचे माजी सरपंच विकासबापु चव्हाण, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.




