पुणे जिल्हा काँग्रेस सोशल मिडिया उपाध्यक्षपदी युवा उद्योजक चेतन कोंढाळकर यांची निवड
किकवी : भोर तालुक्यातील किकवी गावातील युवा उद्योजक चेतन कोंढाळकर यांची पुणे जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी दि. 11 ऑगस्ट 24 ( रविवार) रोजी फार्मसी हॉल येथे निवड करण्यात आली, आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा युवक अध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
भोर-राजगड-मुळशीचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजकारण व राजकारणस सुरूवात केली असुन तालुक्यात त्यांना संग्राम थोपटेचे विश्वासू , खांदे समर्थक म्हणुन त्यांची ओळख आहे, ते स्वतः उद्योजक असुन देखील समाजकार्याकरिता वेळ देत असतात. त्यांची किकवी पंचक्रोशीत उल्लेखनीय असे समाजकार्य असल्याने त्यांची झालेली निवड योग्य असल्याचे बोलले जात आहे.
स्वराज महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोशल मिडिया द्वारे संवाद साधून काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून योग्य संदेश देऊन पारदर्शक, प्रतिसादात्मक कामातून नागरिकांना काँग्रेस पक्ष विषयी जागरूकता निर्माण करुन पक्षाची देह,धोरणा विषय माहिती देणार असुन,कॉग्रेस पक्ष हा सर्वसामान्याचाच कसा आहे,हे पटवुन सांगु.
यावेळी भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, भोर पंचायत समितीचे सभापती लहुनाना शेलार, उपसभापती रोहन बाठे,भोर तालुका युवक अध्यक्ष नितीन दामगुडे, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष तोसिफ अत्तार, काँग्रेस नेते अनिल सावळे किकवी गावातील अक्षय अहिरे, निखिल घारे, प्रथमेश अहिरे, अथर्व पाटणे, प्रशांत राजगुरू, हर्षद जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याची जबाबदारी देऊन खऱ्या अर्थाने विश्वासू व निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिलेली असल्याने भोर तालुक्यातील युवा उद्योजक चेतन कोंढाळकर समर्थकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




