भोर तालुक्यातील लखपती दीदी रेखा काटे यांना पंतप्रधानांसह स्वातंत्र्यदिनाला उपस्थित राहण्याची संधी
भोर : कांजळे, ता.भोर, जि. पुणे येथील रेखा काटे यांची लखपती दीदी म्हणुन निवड झालेली असुन त्यांना 15 ऑगस्टच्या नवी दिल्लीतील लालकिल्ला येथे होणाऱ्या स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमास पंतप्रधानासह उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे.
बचत गटाच्या माध्यमातून उमेद अभियानांतर्गत त्यांनी व्यवसाय सुरू करुन, प्रथम शेतामध्ये विहीर खंदली त्यावर शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नावर भर देऊन त्यातील उत्पन्नातुन दुधाचा व्यवसाय सुरू केला, इथपर्यंत न थांबता त्यांनी मसाल्याचाही व्यवसाय सुरू केला त्यांच्या या यशस्वी प्रवासानिमित्त त्यांची 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी लखपती दीदी म्हणून उमेद अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे.
रेखा काटे यांनी त्यांच्या झालेल्या निवडीबाबत पंतप्रधानांचे, महाराष्ट्र सरकार, उमेद अभियानातील प्रत्येक सदस्य, बचत गटातील सर्व महिला, गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच इथपर्यंत पोहचविण्यात ज्यांचे-ज्यांचे सहकार्य लाभले आशा सर्वांचे त्यांनी आभार मानले.




