सामाजिक

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप : स्वयंदिप सोशल फाउंडेशनचा उपक्रम


­सुनिल सावंत                                                                      भोर,प्रतिनिधी.

भोर : 14/7/2024 (रविवार) रोजी दिक्षाभुमी स्मारक समिती भोर येथे स्वयंदिप सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मानसीताई वानखेडे तसेच विद्यमान संचालक व BSNL चे जनरल मॅनेजर विवेक वानखेडे साहेब यांच्या सहकार्याने आणि भिमकन्या सुनंदाताई गायकवाड यांच्या प्रयत्नांनी भोर तालुक्यातील दुर्गम भागातुन  इयत्ता 1 ली ते पदवीधर शिक्षण घेत असलेल्या 154 विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने भारताच भविष्य आहे. आणि आज अनेक ग्रामीण अर्थकारणामुळे अनेकांना आपल शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागत आहे. त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली की ते शिक्षण थांबवावं लागत आहे. अशाच काही मुद्द्यांवर लक्ष देत स्वयंदिप सोशल फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

Advertisement

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोर नगरपालिकेच्या नगरसेविका रुपालीताई कांबळे, युवा उद्योजक रविंद्रदादा कांबळे, दिक्षाभुमी स्मारक समितीचे खजिनदार बाळासाहेब अडसूळ, उपसचिव अर्जुनदादा शेलार, विद्यमान सदस्य तथा भिम आर्मीचे तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ साळुंखे, आर पी आय चे कार्यकर्ते सुनिलदादा मोरे, महेंद्रदादा रणखांबे या सर्वांनी यशस्वी प्रयत्न केले.

गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांनी या सर्वच टीमचे कौतुक केले, आभार मानले व पुढील सामाजिक कामाकरिता शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!