सामाजिक

“एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण मोहीम : पर्यावरण रक्षणासाठी पुणे-सातारा महामार्ग टोल प्रशासनाचे एक प्रेरणादायी पाऊल


खेडशिवापूर : “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण मोहीम अनुसरून संपूर्ण देशात आणि राज्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पुणे-सातारा रोड प्रायव्हेट लिमिटेड तर्फे एन एच ४८, रोडवरील ठिक-ठिकाणी खेड शिवापूर टोल, आनेवाडी टोल, सातारा तसेच सुस-पाषाण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

प्रदूषण रोखण्यासाठी, जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी व भविष्यासाठी हरित झोन तयार करण्याचा संकल्प केला, टोल प्रशासन वृक्षारोपण करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसुन आले, टोल प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर संबंधित संस्था वृक्षारोपण मोहीमेंमध्ये सामील झाले होते. या मोहिमांद्वारे, महामार्ग आणि परिसरामध्ये अधिक झाडे लावण्याचे काम केले असुन भविष्यात यामुळे पर्यावरण सुधारण्यास मदत होईल.

Advertisement

अमित भाटिया यांच्या  मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धननाचा संकल्प करत १५०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले.त्याचबरोबर परिसरात कचरामुक्ती आणि पाणी संधारणा बाबत माहिती देण्यात आली.

या उपक्रमाचे उद्घाटन श्री. परमेश्वर आरवटकर (टीम लीडर),  आनंद कुलकर्णी, अमित भाटिया (रिजनल हेड – वेस्ट झोन),  राकेश कोळी, माधव टेकवडे, दिव्य प्रकाश भेहरा, सुनिल सुराणा तसेच अभिजीत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपक्रमामध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाहोता.

हा उपक्रम पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल ठरणार असल्याने स्थानिक नागरिकांकडून टोल प्रशासनाचे कौतुक होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!