आंबेडकरवादी युवाच्या वतीने मनुस्मृती दहन आंदोलन.
- खेडशिवापुर : 2 जुन 2024 (रविवार) हवेली,भोर,राजगड (वेल्हा), या तालुक्यातील आंबेडकर युवा यांच्या तर्फे खेडशिवापुर टोलनाका येथे मनुस्मृती दहन करण्याचे आंदोलन झाले.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, एससीईआरटीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला कडाडून विरोध दर्शवत मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रतितात्मक पुतळ्याचे दहन केले गेले, मनुस्मृती मधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात सर्वांनी एकत्र यावं, असं आव्हान प्रवीण ओव्हाळ यांच्या वतीने सर्वच समाज घटकांना तसेच महिलांना करण्यात आले
- ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, तीच मनुस्मृती हे सरकार पुन्हा आणायचा प्रयत्न करत आहे, याचा तीव्र विरोध व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका राज ऊर्फ पप्पु कांबळे यांनी मांडली.
- शिक्षण मंत्री दिपक केसरकरयांनी शिकणात मनुस्मृतीचा समावेश करून चातुवर्ण्य, अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे व समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत होत आहे. असे किशोर अमोलिक यांनी त्याच्या भाषणात सांगितले.
- शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचुप्रवेश कोणालाही मान्य नसून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, ही सर्वमान्य समाज भावना सरकारला समजलीच पाहिजे. आंदोलनात मार्गदर्शन करताना महेंद्र साळुंखे यांनी सांगितले.
- या आंदोलनाची दाखल राज्य सरकारने घेऊन शालेय शिकणात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा निर्णय लवकरात-लवकर माघार न घेतल्यास संपुर्ण महाराष्ट्र भर आंदोलन घेण्यात येईल असे विनोद गायकवाड यांनी सांगितले.
- मनुस्मृती पाळायचीच असेल तर शिक्षण मंत्र्यांनी स्वतःच्या घरात पाळावी असा सल्ला दिपक केसरकराना आपल्या भाषणात नवनाथ कदम यांनी दिला.
- शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळुन टाकलेल्या विचारांना राज्य सरकार जिवंत करण्याचा प्रयत्न करत असुन,शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना त्रीरांजली देण्याचे काम करत आहे, असे मत आकाश उर्फ मुन्ना गायकवाड यांनी मांडले.
- जर शालेय शिक्षणातुन मनुस्मृतीचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने माघार घेतला नाही तर महाराष्ट्रात कोणत्याच मंत्र्यांना फिरू देऊ नका असे आव्हान सागर जगताप यांनी केले.
- फक्त संविधानामुळेच आज एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आहे,मनुस्मृती असती तर हे शक्य होते का ? तसेच राष्ट्रपती एक महिला झाली हे होऊ शकले असते का ? असे काही प्रश्न भाषण करताना श्री वैराट यांनी केले.
- या आंदोलना वेळी शितल कांबळे, तुषार कांबळे, सुनिल सावंत, स्वप्निल सावंत,अरुण रणखांबे,अक्षय गायकवाड,संतोष जाधव,सागर साबळे,सुयश गायकवाड,पप्पु ओव्हाळ,बापु कांबळे,अमोल गायकवाड,राजेंद्र कासारे तसेच शेकडो भिम सैनिक उपस्थित होते.
Advertisement


