सामाजिक

महिला भगिनींसाठी सरकारची बहीण माझी लाडकी योजना


 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना या योजने अंतर्गत 21 ते 60 वयो गटातील महिलांना सरकार दरमहा 1 हजार 500  रुपये देणार आहे.अशी ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा फायदा सुमारे एक कोटी महिलांना मिळणार आहे.या योजनेत पात्र महिलांना शासना मार्फत दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी वर्षाला 2 लाख 50 हजार 500 रुपये पेक्षा उत्पन्न असणे आवश्यक आहे.

राज्यातील सर्वच स्तरातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता काय असावी. 1)  महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. 2)  किमीत कमी वयाची 21 वर्षे पूर्ण असावीत आणि जास्तीत-जास्त वयाची 60 वर्ष पूर्ण होई पर्यंत. 3) राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 4)  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. 5) महिला विवाहित, घटस्फोटीत, निराधार, असल्या तरी ही.

• या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काय असावीत, 1)  योजने करीता ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. 2) आधार कार्ड आवश्यक. 3) महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला 4) तहसीलदार यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखाच्या आत असावा.

Advertisement

अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल. 1) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. 2) योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपद्वारे / सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरु शकतात. 3) पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. 4) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/ वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

• वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती देण्यात येईल.­

• अर्जदार महिलेने स्वतः अर्ज भरताना त्याठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणे करून तिचा थेट फोटो काढता येईल, आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

• 1 जुलै 2024 पासुन अर्ज करू शकता.

• अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2024 पर्यंत आहे.

• तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024

• तात्पुरत्या यादीवरील तक्रार / हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै आहे.

• अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 आहे.

• लाभार्थ्यांचे बँकमध्ये E-KYC करणे बंधनकारक 10 ऑगस्ट 2024

• लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024

• त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखे पर्यंत बँकेत जमा होतील.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!