रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्यामार्फत राजगड (वेल्हा) ग्रामीण रुग्णालयास फिरता दवाखाना रुग्णवाहिका (मेडिकल व्हॅन) भेट
विनोद गायकवाड राजगड तालुका
राजगड (वेल्हा) : दि. 1/7/24 (सोमवार) रोजी रोटरी क्लब ऑफ़ पुणे यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज अशी ही रुग्णवाहिका नुकतीच सुपूर्द करण्यात आली.
राजगड तालुक्यातील दुर्गम भागात तसेच आसपासच्या भागात आरोग्य सुविधा देण्यात महत्वाची भूमिका बजावता येणार आहे. या भागातील गोरगरीब रुग्णांना वेळ व पुरेशी वाहतूक सुविधा अभावी वैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होत होता. या रुग्णवाहिकेमुळे गरजूंना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे. परिणामी वैद्यकीय सेवा सुलभ होईल आणि रुग्णांचे जीव वाचतील.
रोटरी क्लब ऑफ़ पुणेचे सर्वच सदस्यानी रुग्णवाहिका भेट करत समाजाप्रती असलेली करुणा व कटिबद्धता दाखवून दिली आहे. या उपक्रमामुळे आरोग्यसेवा सुधारण्यावर व समाजातील रुग्णांचे जीव वाचवण्यावर प्रभाव पडेल. मेडीकल व्हॅन चे उद्घाटन व मेडिकल कॅम्पचे आयोजन आज सकाळी ग्रामीण रुग्णालय राजगड (वेल्हे) या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत वेल्हे व रोटरी क्लब यांच्यावतीने आयोजित केले होते, मेडीकल व्हॅनची पुजा व मेडीकल कॅम्पचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग गाडगीळ व वेल्हेचे माजी सरपंच मेघराज सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांचाळ सर,गोरक्ष भुरुक,वेल्हेचे माजी सरपंच संतोष मोरे,वेल्हेचे मा.उपसरपंच सुनील राजीवडे,भारती आयुर्वेदिक रुग्णालयाच्या डॉ.प्रियंका कुंभार,आशा कदम, देवदत हंबडींकर,डॉ.शिवाजी, विनोद गायकवाड, दिनेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते…




