सामाजिक

विंझर येथे बुध्द जयंती मोठ्या उत्सवात साजरी


 

राजगड (वेल्हा) : विंझर गावामध्ये बुध्द जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली,दलित युथ पँथरचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी यानिमित्त भाषण केले, बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुषानी गुरू मानले आहे, बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.

Advertisement

विंझर गावच्या माजी सरपंच निर्मला गायकवाड यांनी कार्यक्रमाला उपस्थित बांधवाना बुध्द वंदना, 22 प्रतिज्ञाच्या महत्व सांगितले,जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला, मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

कार्यक्रम झाल्यानंतर सर्वाना खिरीचे वाटप करण्यात आले, तसेच कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ महिला मंडळ, तरुण वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता,

कार्यक्रमाचे नियोजन चेअरमन सदाशिव गायकवाड, भिमा गायकवाड, छाया गायकवाड, सुवर्णा गायकवाड, गहु गायकवाड यांनी केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!