आधी तरुणाचे अपहरण केले नंतर विवस्त्र करून बेदम मारहाण
पेंजळवाडी : 15/5/2024 रोजी सकाळी 11.00 च्या सुमारास मौजे पेंजळवाडी ता. भोर जि. पुणे. येथुन एका तरुणास 1) आदेश बोबडे पुर्ण नाव समजु शकले नाही रा. राजापुर ता. भोर जि. पुणे 2) सोपान जाधव पुर्ण नाव समजु शकले नाही रा. भोंगवली ता. भोर जि. पुणे 3) अमोल धाडवे रा.शिंदेवाडी ता. खंडाळा, जि. सातारा यातिघांनी तरुणांची इच्छा नसताना शिरवळ येथे जेवण्याकरीता जाऊयात म्हणुन जबरदस्ती करू लागले, त्याने प्रतिकार करत असताना त्यास मारहाण करुन त्याचे ताब्यातील कार नंबर एम. एच. 12 यु.एफ. 2522 यामध्ये बळजबरीने बसवुन नेऊन अ.क्र. 1, 2, व 3) आदेश बोबडे याचा मित्र अमोल घाडगे रा. शिंदेवाडी ता. खंडाळा जि. सातारा यांनी संतोष रामचंद चव्हाण याव्यक्तीस त्याचा मित्र दादा चव्हाण कोठे आहे त्याची माहिती दिली नाहीतर आमच्या सारखं वाईट कोण नसेल त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून अ.क्र. 1 ते 3 यांनी रोख रक्कम 26,000/- रू बळजबरीने काढुन घेतले व हाताने, लाथा बुक्कांनी तसेच स्टिलचे बाटलीने हातापायावर मारहान करून दुखापत केली आहे. त्यानंतर तो कसा-बसा त्त्याच्या तावडीतुन कसातरी सुटकुन पळवुन आला व राजगड पोलीस स्टेशनला जाऊन रितसर या तीन इसमांविरूध्द् कायदेशीर तक्रार केली आहे.
पुढील तपास पोलीस निरिक्षक गवळी सो. यांच्या मार्गदर्शना खाली दखल अंमलदार – पो ना जाधव तपासी अंमलदार – पोसइ पाटील हे तपास करत आहेत.




