क्राईम

बँकेचे ATM फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना अटक


बँकेचे ATM सेंटरमध्ये जेलीटीन कांडयाच्या सहाय्याने स्फोट घडवुन दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या टोळीस दरोडाच्या साहीत्यासह प्रसंग अवधान राखुन मोठ्या शिताफीने केले जेरबंद, तळबीड उंब्रज पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी.

मा.पोलीस अधिक्षक सातारा व अप्पर पोलीस अधिक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो कराड विभाग कराड यांनी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने सातारा जिल्हा हद्दीत अधिकारी व अमंलदार यानी सर्तक रात्रग्रस्त करणे बाबत सुचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे तळबीड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो. नि. किरण भोसले यांना दि १६/०५/२०२४ रोजी कराड विभागीय रात्रग्रस्त होती त्यांच्या सोबत पोलीस ठाणे मधील पो. कौं विभुते व चालक पो की पाटील हे दोघे होते. शासकीय वाहनांने रात्रग्रस्त पेट्रोलिंग करीत असताना उब्रज पोलीस ठाणे हद्दीत शिवडे या गावाजवळी कृष्णा पुलाच्या अलिकडे रोडच्या बाजुस अधारात पाच ईसम दिसले त्याच्या संशय आल्याने शासकीय वाहन काही अंतरावरती थांबवून उब्रज पोलीस ठाणेशी सपर्क करुन मदतीसाठी पोलीस ठाणे कडील स.पो.नि भोरे व स्टाफ याना तात्काळ बोलावुन घेवुन व तळबीड व उंब्रज पोलीस ठाणे कडील अधिकारी व स्टाफ यांनी चार संशयीत इंसमाना घेराव घालुन ताब्यात घेतले त्याच्या एक साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला, ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे पुढील प्रमाणे १) वैभव राजेंद्र साळुंखे वय ३३ (२) ओकार बाळासाहेब साळुंखे वय २३ (३) अदित्य सतोष जाधय वय १९ रा मोळाचा ओड़ा सातारा जि सातारा व (४) विधीसंघर्ष बालक (५) पळुन गेलेला नांव गावं माहीत नाही.

Advertisement

ताब्यातील इसमांची अंगझडती मध्ये व त्यांच्या कब्जातुन खालील प्रमाणे दरोडयाच साहीत्य मिळून आले. १) ०३ लहान मोठे कटावणी, (२) ०४ जिलेटीन कांडया (३) डेटोनेटर (४) लहान बॉटरी (५) एक्सा ब्लेड दोन (६) मोठी करवत (७) कोयता (८) ब्लॉस्टीगची वायर (९) दोन मोटार सायकल वाहन (१०) तोडाचे मास्क याप्रमाणे एकुण १,३७,९८०/- (एक लाख सदतीस हजार नवशे रुपये) किमतीचे साहीत्य मिळुन आले. वरील इसमाच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सुमारे आठ दिवसापासुन मसुर येथील हीताची कंपनीचे एटीएम सेंटर जेलीटीने स्फोट घडवुन दरोडा टाकणेचे प्लानिंग केले होते त्याप्रमाणे त्यानी चार ते पाच दिवासापुर्वी त्या एटीएम सेंट्रच्या ठिकाणी रेखी करुन आले होते. व आज रोजी ते ठरलेल्या प्लानिग प्रमाणे सदरचे एटीएम सेंटर जेलीटीने स्फोट घडवुन दरोडा टाकणेच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील होणारी मोठी घटना टळलेली आहे. यापैकी संशयीत ईसम वैभव राजेंद्र साळुंखे याच्या विरुध्द कोरेगावं, बडुज. पोलीस ठाणे येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. यातील पळुन गेलेला संशयीत ईसम यांची माहीती अटक केलेल्या आरोपीचे कडुन त्यांचे नांव निष्पन्न करुन त्यांस अटक करणेची तजवीज करण्यात आली आहे.

  1. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक समीर शेख मा अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल मा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, पो.कॉ विभुते व चालक पो. काँ पाटील व उबंज पोलीस ठाणे कडील स.पो.नि.श्री भोरे पो.हया १३२१ धुमाळ, पो. कॉ-साळे, पो. कॉ माने, यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ठ कामगीरी केली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास स.पो.नि भोरे उबंज पोलीस ठाणे हे करीत आहे.
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!