क्राईम

भोर बाजारपेठेत तरुणावर कोयत्याने वार करुन हल्लेखोर फरार


­भोर,प्रतिनिधी.

भोर : दि. 19/7/2024 (शुक्रवार) संध्याकाळी 6: 30 च्या सुमारास भोर शहरामध्ये मंगळवार पेठेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने कापड दुकानात शिरून तरूणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.या घटनेनत तरुण रक्तबंबाळ झाला असुन या हल्ल्यामुळे पुर्ण बाजारपेठच हादरून गेली.

Advertisement

भोर शहरातील मंगळवारपेठेत सचिन मांढरेचे कपड्याचे दुकान  असून त्यांच्याच दुकानात शिरून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला, महाराष्ट्रीयन बेंदूर सणाची सगळीकडे लगबग होती, भोरच्या बाजारपेठेत नेहमी पेक्षा आज जरा जास्तच गर्दी असल्याने हल्लेखोराने याचाच गैरफायदा घेत हा हल्ला केला. हल्ल्यात त्याच्या मानेवर कोयत्याने वार झाल्याने त्यास एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, हल्लेखोराला स्थानिक तरुणांनी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु पळून जाण्यात तो यशस्वी झाला, आरोपी हा अल्पवयीन असल्याचे प्राथमिक माहितीत निष्पन्न झाले आहे, स्थानिक लोकांकडून घटना ही पूर्वीच्या असलेल्या वैमनस्यातून घडल्याची माहिती मिळत आहे, या बाबतीत भोर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली असून पुढील तपास भोर पोलीस करत आहेत,

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!