क्राईम

भोरमध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल:अपक्ष उमेदवाराचे बिना परवानगी प्रचार संदेश दाखवणे पडले महागात


 

भोर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. सध्या राजकीय पक्षांचा आणि उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचला आहे. निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचे उल्लंघन होते आहे का यावर बारीक नजर ठेवली जात आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट गुन्हा दाखल केला जात आहे.

भोर पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर 2024 रोजी आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल जगन्नाथ पाटील (वय 52, कृषी पर्यवेक्षक, रा.भोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 1) अमोल दशर1थ जाधव (रा. होळकर वाडी, ता. हवेली) 2) कृष्णा महादेव कांबळे (रा. बालाजी पार्क, केसनंद, ता. हवेली) यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता प्रचारासाठी वाहनांवर एल.ई.डी स्क्रीन वर प्रचार संदेश दाखवत होते.

Advertisement

या प्रकरणात कारवाई  करण्यात आलेल्या वाहनांवर किरण दगडे (अपक्ष उमेदवार, भोर विधानसभा मतदार संघ) यांचे प्रचार संदेश दाखवण्यात आले होते. आदर्श आचारसंहिता 16 ऑक्टोबरपासून लागू झालेली असून, प्रचारासाठी परवानगी घेणे आवश्यक होते. आरोपींनी निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टरी क्रमांक 17/2024 नुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास भोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!