आमदार संग्राम थोपटेंनी पवार साहेब व ताई यांच्या कठीण काळात जी मोलाची साथ दिली त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे : गणेश खुटवड
भोर : भोर विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणूकीत एकूण 6 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने भारतीय कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, त्याबद्दल स्वराज महाराष्ट्र न्यूज च्या माध्यमातून सांगू इच्छितो भोर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांना महत्त्वपूर्ण संदेश की साहेबांनी बनवलेले तालुक्यातील अनेक मोठे नेते साहेबांची व त्यांची साथ सोडून लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान साहेब ताईंच्या विरोधात भूमिका घेतली त्यावेळी भक्कमपणे साथ देणारे संग्राम थोपटे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आव्हानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार भोर तालुका युवक अध्यक्ष गणेश खुटवड यांनी केले आहे.
गेल्या 6 महिन्यांपूर्वी बारामती लोकसभेची निवडणूक पार पडली. तत्पूर्वी पक्षांतर्गत दुफळी झाल्यामुळे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदरणीय साहेब व ताईंना सोडून दुसऱ्या पक्षात गेले. आजपर्यंत साहेब व ताईंनी अनेकांना नेते बनविले, अनेकांना पदे दिली, महत्वाच्या जबाबदाऱ्या व संधी दिल्या. परंतू ऐन वेळेला त्यांनी साहेबांची व ताईंची साथ सोडली.
गेली अनेक वर्षे आपल्या तालुक्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष सर्व निवडणूकांमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते, तो संघर्ष सर्वांना परिचित आहे. आपल्या पक्षात फूट पडल्यावर साहेब आणि ताईंना सोडून आपलेच नेते, पदाधिकारी दुसरीकडे गेले. परंतू त्या संघर्षाच्या काळात महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षातील अशी काही नेतेमंडळी आहेत, ज्यांनी पडत्या आणि संघर्षाच्या काळात साहेबांना व ताईंना साथ दिली. त्यामध्ये एक नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल ते म्हणजे आपल्या भोर विधानसभेचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे.
सर्वांनी तालुक्यात आणि शहरात कॉंग्रेस पक्षाच्या आणि आमदार संग्राम थोपटे विरोधात निवडणूक प्रक्रीयेत सहभाग घेतला, त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या. त्यापैकी मी एक होतो.
परंतू नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून आमदार संग्राम थोपटे यांनी प्रामाणिकपणे ताईंच्या विजयासाठी मेहनत घेताना आपण सर्वांनी त्यांना पाहिले आहे.
निवडणूका येतात आणि जातात. प्रत्येत निवडणूकीत समीकरणे बदलत असतात, भूमिका बदलत असतात. परंतू या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणूकीत आमदार संग्राम थोपटे यांनी आपले दैवत आदरणीय पवार साहेब यांच्या कठीण काळात जी मोलाची साथ दिली, त्याची परतफेड करण्याची आता हि वेळ आहे, तरी आपण सर्वांनी मिळुन आमदार संग्राम थोपटेंना जास्तीत-जास्त मताधिक्याने निवडून आणायचे आहे.
2024 ची विधानसभा निवडणूक हि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. ज्यांनी ज्यांनी मराठी माणसांचे हक्काचे 2 पक्ष स्वताच्या स्वार्थासाठी फोडले, त्या महाराष्ट्रद्रोह्यांना योग्य ते उत्तर देण्यासाठीही हि निवडणूक आहे.
भोर विधानसभेला पवार साहेबांचा उमेदवार नाही, तुतारी चिन्हाचा उमेदवार नाही. मग आपण कशाला एवढी काळजी करायची!” असं म्हणून चालणार नाही,जर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात पवार साहेबांचे हात बळकट करायचे असतील, तर महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार निवडून देणे आपले कर्तव्य आहे.म्हणून कोणीही चुकीच्या भूलथापांना बळी न पडता आदरणीय पवार साहेब व सुप्रियाताई यांची ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करावे. तसा निरोप आपण आपापल्या गावात व परिसरात सर्व मित्रपरिवार, नातेवाईक यांना द्यावा अशी विनंती त्यांनी सर्वांना केली.




