पवनचक्कीच्या वादातून तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्ला ; बिडच्या घटनेची पुनरावृत्ती टळली
तुळजापुर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावातील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, नशिब बलवंतर म्हणुन ते या हल्ल्यातुन वाचले, पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचे समोर आले आहे, काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील मस्सजोग येथील सरपंच देशमुख यांची पवन चक्कीच्या वादातूनच हत्त्या करण्यात आली होती.
सरपंच नामदेव निकम हे बारुळ गावातून मेसाई जवळगा गावाच्या दिशेने येत होते. त्यावेळी काही गुंडांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. सुरुवातील त्यांच्या कारवर अंडी फेकली. त्यांनंतर काचा फोडण्यात आल्या. यानंतर त्यांच्या कारवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला.या हल्ल्यात सरपंच निकम थोडक्यात बचावले. त्यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती होती, ती व्यक्ती जखमी झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर पालिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असुन पुढील तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.




