श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा लोकार्पण सोहळा ; 1/1/2025 रोजी आपटी ता.भोर येथे आयोजित करण्यात येत आहे
आपटी : पुणे जिल्हा,भोर तालुक्यातील आपटी येथे 1 जानेवारी 2025 (बुधवार) रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, यानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी ता. भोर यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा बुधवार 1 जानेवारी 2025
• सकाळी 7 वाजता – श्री जननी देवीला अभिषेक
• सकाळी 9 ते 12 वाजता – आपटी ग्राम प्रदिक्षणा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक
• दुपारी 12 ते 2 वाजता – महाप्रसाद व्यवस्था
• दुपारी 2 ते 3 वाजता – हिंदवी स्वराज्य ध्वजारोहण व छत्रपती शिवाजी महाराज विधीवत मूर्ति पूजन
• दुपारी 3 ते 4 वाजता – पुरस्कार वितरण व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
• सायंकाळी 4 ते 5 वाजता – शाहीर पोवाडा कार्यक्रम
• सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजता – शिवचरित्रकार कट्टर हिंदुत्ववादी ह.भ. प. श्री अनिल देऊळकर महाराज यांची किर्तन सेवा
• रात्री 8 वाजता – भोजन व्यवस्था
अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने 8 विशेष पुरस्कार मान्यवरांना देण्यात येत आहेत.
1) ह.भ.प.श्री महादेव आण्णा ढेरे – जीवन गौरव पुरस्कार
2) ह.भ.प.श्री दगडू बुवा जेधे – मृदुंग सेवा रत्न पुरस्कार
3) श्री.दगडूबुवा पारठे – भजन सम्राट पुरस्कार
4) ह.भ.प.श्री रामदास महाराज चऱ्हाटे – वारकरी भूषण पुरस्कार
5) डॉ. प्रदीप पाटील सर – आरोग्य सेवक पुरस्कार
6) श्री.शिवाजीदादा साळेकर – समाजसेवक पुरस्कार
7) श्री.वाघराळकर सर – आदर्श शिक्षक पुरस्कार
श्रीमंत श्री छत्रपती उदयनराजे भोसले- लोकसभा खासदार यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडत असून त्यांच्या समवेत…
स्वराज्य उभारणीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांना हातभार लावणाऱ्या मावळ्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.
• श्री.अमितजी गाडे – छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे यांचे वंशज
• श्री.अमरसिंह जाधवराव – लखोजी राजे जाधवराव यांचे वंशज
• श्री.रविदादा कंक – सरनोबत येसाजी कंक यांचे वंशज
• श्री इंद्रजीत घोरपडे – नरवीर संताजी घोरपडे यांचे वंशज
• श्री मारुतीआबा गोळे – नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज
• श्री.कुणालजी मालुसरे – नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज
• श्री रणधीरजी जेधे – वीर कान्होजी जेधे यांचे वंशज
• श्री करणसिंह राजे बांदल – वीर कृष्णाजी बांदल यांचे वंशज
• श्री बाळासाहेब सणस – नरवीर बिलाजी सणस यांचे वंशज
• श्री दत्ताजी नलावडे – इतिहास संशोधन व ज्येष्ठ पत्रकार
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात पहिले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी होत असून या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान ह.भ.प.ॲड.श्री राहुल महाराज पारठे ( संस्थापक अध्यक्ष- अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी, झी टॉकीज फेम, युवा किर्तनकार, शिव व्याख्याते ) यांनी केले आहे.
• सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा…
• सोहळा मराठी अस्मितेचा…
• सोहळा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा…
• सोहळा पुणे जिल्ह्याच्या अभिमानाचा…
• सोहळा भोर तालुक्याच्या अस्मितेचा…
• सोहळा आपटी गावच्या भाग्याचा…
• सोहळा तुमच्या-आमच्या जगण्याचा…
• सोहळा ह.भ.प.राहुल महाराज पारठे यांच्या जिद्दीचा…




